शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८

Dr. Mukund Sawant


मला भावलेले प्रा. मुकुंद सावंत
परिचय
प्रा. मुकुंद सावंत सर आणि मी धारूर महावीद्यालयात एकाच वर्षी रुजू झालोत ते वर्ष म्हणजे १९९२. माझी नेमणूक त्यावेळी अस्थायी स्वरुपाची होती तर सावंत सर गंगापूरच्या मुक्तानंद महाविद्यालयातून बदली होऊन इथे आले होते. प्रा. मुकुंद सावंत सर हे त्यावेळी धारूरचे  नगराध्यक्ष म्हणून नगर  पालिकेवर निवडून  आले होते. मी त्यावेळी अत्यंत नावाखा असल्यामुळे त्यांच्याशी तसा माझा जास्त परिचय नसला तरी त्यांनी त्यावेळी राजकारणात केलेला बंडखोरी आणि त्यांचे समाजातील स्थान यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे एक वेगळेच आकर्षण होते. त्याच दरम्यान त्यांच्याकडे झालेली चोरी, त्यांना आलेले हृदयविकाराचा आलेला झटका यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व आणखीच लक्षवेधी  झाले आणि त्यांचा परिचय व्हावा असे वाटू लागले.
हळू हळू मीही महाविद्यलयात रमू लागलो, दुपारनंतर आमची स्टाफरूम मध्ये भेट होऊन   चर्चा होऊ लागली. कधी मतभिन्नता तर कधी त्यांचे विचार मला पटू लागले. नंतर आमच्यात बर्यापैकी मैत्री झाली. महाविद्यालयाचे प्रश्न, विज्ञान शाखेचे अनुदान, मुंबईचे जीवन,  राजकीय चर्चा, सामाजिक प्रश्न, आहार  यावर तासंतास आम्ही चर्चा करत असू. सुरुवातीच्या काळात टे मांसाहारी आहारावर खूप तिखट शब्दात टीका करत नंतर टे आमच्यासोबत जावू लागले हा भाग वेगळा. दरम्यानच्या काळात आमचा स्नेह वादात गेला आणि आमची बऱ्यापैकी घनिष्ट मैत्री झाली.
विद्यार्थी प्रिय आणि व्यासंगी शिक्षक
दुपारच्या सत्रात आम्ही स्टाफ रूम मध्ये चर्चा करत बसत असू. शिक्षण क्षेत्रातील प्रश्ना संबंधी त्यांची मत अन तळमळ मलाच नाही आम्हा विज्ञान शाखेतील सर्वांना  प्रभावित करू लागली. त्यांच्यातल खरा शिक्षक आम्हाला लक्षात येऊ लागला. प्रा. मुकुंद सावंत सर नियमित तासिका घेत असत. नगराध्य पदावर काम करत असताना असो कि प्राचार्य पदावर कार्यरत असतानाही त्यांनी कधी तासिका न घेतल्याले आठवत नाही. चर्चे अंती ते विद्यार्थी प्रिय शिक्षक असल्याचे लक्षात आले. धारूर महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतचे सर्वच प्राध्यापक हे नियमित अन विद्यार्थी प्रिय असल्याचे निदर्शंस आले. त्यामुळे वाणिज्य शखेत नियमित येणाऱ्या मुलांचे संख्याही भरपूर असायची आणि निकालही उत्तम लागावयाच. सार्वजनिक  जीवनात सक्रीय असूनही सावंत सर त्याला अपवाद नव्हते. सावंत सरांच्या तासाला भरपूर मुल-मुली उपस्थित असायच्या आणि  सरही मुलांना आवडीने अन तन्मयतेने शिकवायचे. शिक्षणाती नवे प्रवाह, आधुनिक अध्यापण  पधत्ती यांचा ते वापर करून ते विद्यार्थ्यांना  मनापासू  शिकवत असत. सावंत सर आमच्यासाठी एक आदर्श शिक्षक म्हणून आम्हा नवीन लोकांना नेहमीच प्रेरणा देत राहिले.
कुशल प्रशासक
दरम्यानच्या काळात डॉ. बाबासाहेब कोकाटे यांनी प्राचार्य पद सोडल्या नंतर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांच्यावर धारूर महाविद्यालयाच्या प्रभारी पदाची जिम्मेदारी सोपवली . त्या संदर्भात संस्थे कडून विचारणा झाल्यानंतर त्यांनी ग्रंथपाल देशपांडे सर आणि ईतर काही वरिष्ठ सहकार्यासोबत चर्चा करून जिम्मेदारी घेण्याची तयारी दर्शवली.  अश्या प्रकारे प्राचार्य पदाच्या कार्यकाळात त्यांनी महाविद्यलयात एक चांगली टीम निर्माण केली आणि सर्वांना आपुलकीने कामाला लावले. अर्थात वेळप्रसंगी त्यांनी कठोर भूमिका घेऊनही आपली प्रशासकिय चुणूक द्खून दिली.  नक चे काम, हिंदीचे राष्ट्रीय चर्चा सत्र, विद्यापीठ अनुदान आयोगाचे वसतिगृहाचे बांधकाम, शेतकरी परिषद व इतर अनेक उपकराचे यशस्वी आयोजन त्यांच्या प्रशास्कीय कामाचे धोतक आहेत. किती जावाचा मित्र असेल तरीही तासिकांच्या बातीत त्यांनी कोणाचीही गय केलेई नाही. त्यांच्यात उत्तम नेतृत्व क्षमता आहे  आणि प्रशासनावर त्यांची मजबूत पकड असल्यामुळे त्यांच्याकडे निर्णय क्षमता असायची अन त्यामुळे प्रशासन गतिमान व्हायचे. संस्थाचालकांचा संपुर विस्वास, शिक्षक-शिक्षकेतर  कर्मचार्यांचे सहकार्यांची, विद्यार्थाय्न्विषयी तळमळ, पालकांशी असणर सुसंवाद यामुळे त्यांचा प्राचार्य पदाचा कार्यकाल स्मरणीय राहिला.
प्रेमळ, कुटुंब वत्सल आणि व्यवहार चतुर
सार्वजनिक जीवनात आणि महाविद्यालय वेगवेगल्या जिम्मेदारी आणि आपले सर्व कामकाज नियमित अंत काटेकोर पाने पारपडणारे प्रा. सावंत आपली व्यक्तिगत अनो कौटुंबिक जीवनातही अत्यंत यशवी राहिले आहेत. शेती असेल, छोटी-मोठी खरेदीअसेल, बाजारपेठेतील उठ-बस असेल त्यांच्यातील व्यवहारीकपणा आपल्याला ठळकपणे जाणवतो. ते जिवनात कोणत्याही व्यवहारात आपल्याला यशस्वी झालेले दिसतील. खरेतर तो व्यवसायिकपणा धारूरच्या मातीतच आहे  सावंत सरही त्याला अपवाद नाहीत त्यामुळे सावंत सरांनी कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत उत्तम ठेवली आहे. मुळात संवेदनशील असणारे सावंत सर अत्यंत कुटुंब वत्सल आहे. आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या  त्यांनी अत्यंत व्यवस्थित  पार पडल्या  आहेत. सावंत सर नेहमीच आपल्या मित्र परिवार आणि सहकार्याशी प्रेमाने वागताना आढळतात आणि वेळोवेळी गरजेप्रमाणे अनिकांना त्यांनी सहकार्य केलेले आहे.
मुंग्यांचे भारूड :-
मुंगी पृथ्वीतलवरील  एक छोटासा जीव. सगळ्यांच्या ओळखीचा आणि सर्वत्र आढळणारा एक  . अंटार्टिका वगळता सर्वत्र मुंग्यांचे वास्तव्य आढळते.संधिपाद प्राण्यांच्या समूहातील कीटक या वर्गातील हायमेनॉप्टेरा या  गटात   मधमाश्या, भुंगा, गांधीलमाशी व इतर  कीटकांसह मुंग्यांच्या फॉर्मिसिडी या कुटुंबाचा  समावेश होतो.    आजमितीला पृथ्वीवर मुंग्यांच्या चौदा हजारापेक्षा जास्त जाती  आहेत. भारतात मात्र  मुंग्यांच्या हजारापेक्षा कमी  जाती आढळतात. 

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

"तुका म्हणे होय मनाशी संवाद!
अपलाची वाद आपल्याशी!!"
------ संत तुकाराम
"सत्य असत्याशी मन केले ग्वाही !
मानियले नाही बहुमता!!"
------ संत तुकाराम

रविवार, ३ एप्रिल, २०१६

शेतकरीविरोधी कायदे परिषद, औरंगाबाद
          तुम्ही किसानपुत्र आहात, संवेदनशील आहात. शेतकरी आत्महत्त्या व एकूणच शेती व शेतकऱ्यांच्या  समस्यांमुळे तुम्ही चिंतीत आहात. शृजक शेतकरी   राष्ट्रसंपतीचा खरा  निर्मीता, करोडो देशवासियांचा अन्नदाता, शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे  आज देशोधडीला लागला आहे. अस्मानी व सुलतानी संकटांनी जर्जर झाला आहे. आयात निर्यात   धोरण, सिलिंग, जमीन अधिगृहण, गोवंश हत्त्या बंदीअत्यावशक वस्तू कायदा, शेडूल नऊ, इत्यादी  अनेक कायद्यांनी शेतीचे  शेतकऱ्यांचे  बेमालूमपणे शोषण करून त्यांचे जगणे नामोहरम  केले आहे. यामुळे शेतकरी खचला आहे व तो आत्महत्येस प्रवृर्त होत आहे. यामुळे प्रत्येक संवेदनशील भारतीय चिंतीत आहे, अस्वस्थ आहे. हे सर्व शेतकरी विरोधी  धोरणाचे  परिणाम आहेत. शेतकरी विरोधी धोरण समजून घेण्यासाठी आणि  मा. शरद जोशी यांच्या विचारांची प्रेरणा घेउन शेतकऱ्यांच्या पायातील शेतकरीविरोधी कायद्याच्या बेड्यावर घाव घालण्यासाठी आता किसानपुत्र सरसावले आहेत.
       आपणासही  शेतकऱ्यांसाठी   काही करावेसे वाटत असेल तर तुम्हाला हे शेतकरीविरोधी कायदे समजून घ्यावे लागतील. किसानपुत्रांसह सर्वांनी या शेतकरीविरोधी कायद्यांची माहिती मिळावी म्हणून औरंगाबाद येथे शेतकरीविरोधी कायदे परिषद आयोजित करण्यात आली  आहे.  प्रवेश मोफत परंतु मर्यादित असून  सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती.  
प्रमुख वक्ते- अॅड. दिनेश शर्मा, अॅड. महेश भोसले, अॅड. प्रकाशसिंह पाटील.
दिनांक -- 19 एप्रिल 2016 मंगळवार, सकाळी 10.30 वा.

स्थळ- यशवंतराव चव्हाण सभागृह, म.सा.प. परिसर, पैठण गेट, औरंगाबाद

-:संयोजक :-

किसानपुत्र  आंदोलन, औरंगाबाद आणि  शेतकरी संघटना औरंगाबाद

प्रा.  डा. राम चव्हाण     श्री. कैलाश तवार        अड.निनाद पाटील      श्री शशिकांत वडले
९४२३३५५२९२           ९४२२३६२७२६         ९४२३७८७९४०        ९४०४०४२७३८


शुक्रवार, ४ मार्च, २०१६

किसानपुत्र  आंदोलन
किसान पुत्र बंधू भगिनी … नमस्कार
          भारत हा कृषी प्रधान देश आहे असे म्हटले जाते . परंतु आर्थिक सर्व्हेक्षणानुसार, आपल्या देशातील या भूमिपुत्रांनी  कष्ट आणि प्रयोगशील पणातून एका बाजूला देशात अन्नधान्याची मुबलकता आणली कृषी उत्पादनांचे अनेक उचांक निर्मान् केले आहेत   आणि त्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला आहे परंतु दुसऱ्या बाजूला कृषी क्षेत्राचा राष्ट्रीय विकासातला वाटा (GDP 15% )घटत आहे आणि दररोज अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेती व शेतकरी आज अत्यंत जटील अवस्थेत  आहेत. सतत पडणारा दुष्काळ,नापीक झालेली  शेती,   तरुण होतकरू शेतकऱ्यांच्या आत्महत्या व त्यामुळे  शेतीत आलेले प्रचंड  नैराश्य एका बाजूला आणि उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ट नौकरी असे म्हणत म्हणत स्वत्रन्त्रोत्तर काळात शेतकरी आणि शेतीच्या लुटीचे  तंत्र सक्षम पणे  राबविण्यात आले .  स्वातंत्रोत्तर  काळात हरित क्रांतीआणि धवल क्रांती मुळे देशात अन्नधान्याची मुबलकता आहे आणि त्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला असला तरी शेतकरी मात्र देशोधडीला लागला आहे 
             नियंत्रणमुक्त अर्थव्यवस्था, जागतिकीकरण व खाजगीकरण यामुळे इंडियात झालेले उत्साहाचे        वातावरण. प्रगती व विकासाचे निर्माण झालेले स्वप्न आणि त्यातही नोकरदारांचे आर्थिकलाड त्यामुळे आलेली सूज  व दिसणारा झगमगाट मन अस्वस्थ होऊन जायचे, कासावीस होते . भारतीय उद्दोग क्षेत्रात देशी वेदेशी गुंतवणूक होत आहे . शहरात सर्वच क्षेत्रात लोक क्षमतेपेक्षा जास्त कमवताना दिसत अहेत. उदाहरण म्हणून क्रिकेट क्षेत्र असो व चित्रपट क्षेत्र असो, या सगळ्या व्यवसायात प्रचंड पैसा गुंतवल जातो व  उलाढाल होते. खरे तर हि क्षेत्रे खऱ्या अर्थाने संपत्तीची निर्मिती नाही तर फक्त उलाढाल करतात . शेतीमध्ये खऱ्या अर्थाने संपत्तीची निर्मिती होते . परंतु शेतीमध्ये पैसा नाही, शेतीमध्ये मात्र लोक गुंतवणूक करायला  तयार नहित. शेती हा तोट्याचं व्यवसाय झाला आहे . पर्याय म्हणून कोणीही शेतीची उद्दोग म्हणून निवड करत नाही...तर प्रत्येकजण शेतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे 
             स्वतंत्रोतर   काळात  देशातील संपूर्ण शेतकरी कष्टकरी सृजक समाज   देश विकासात सहभाग त्यातून समृद्ध होणारी खेडे आणि शहराची  मर्यादित वाढ याचे एक संतुलित  विकासाचे स्वप्ण  दिसले होते .  परन्तु पुन्हा एकदा कविवर्य सुरेश भटांच्या शब्दात, " उषःकाल होताहोता काळरात्र झाली …अरे आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली … " असे म्हणावयाची वेळ आली आहे … चाळीस वर्षापूर्वी शिकत असताना शेतिअर्थक्रान्तिचे प्रेणेते, शेतकऱ्यांचे पंचप्राण   मा . शरद जोशी साहेबांच्या आंदोलने केलेली वैचारिक क्रांती त्यातून  निर्माण झालेली दृष्टी,     इंडियात स्थायिक होऊनही  अस्वस्थ करणारे भारतीयत्व, यामुळे  तुमच्या माझ्या सारखी अनेक किसान पुत्र अस्वस्थ अहेतअशा वेळी  तुमच्या माझ्या सारखी अनेकांना  शेतीची व  शेतकर्यांची हि परवड थांबली पाहिजे असे मनापासून वाटते . त्याच वेळी  किसानपुत्र  आंदोलनाची हाक कानी पडली……  या  किसानपुत्र  आंदोलनाने  एक आशा  निर्माण केली आहे . परंतु  आता काळ बदलला  आहे. रस्ता रोको, संप ,  मोर्चा या प्रकारची आंदोलने आता करावयाची गरज राहिली असे वाटत नाही …. शेतकरी व शेतीविरोधी मानसिकता बदलण्यासाठी सर्वच आघाड्यावर किसान पुत्रांना लढावे लागणार आहे. अन्नधान्य महागाई विरोधी चर्चेत सहभाग, लिखाणाच्या माध्यमातून, नियोजन प्रक्रियेवर परिणाम करणे, शेतकरी विरोधी कायदे  बदलणे अशी आंदोलने करणे. सोशल मिडिया चा वापर  नियंत्रणमुक्त अर्थव्यवस्था, जागतिकीकरण व खाजगीकरण याचे फायदे शेतीत व ग्रामीण भागातील कष्टकरी समाजाला मिळाली पाहिजेत या साठी किसान पुत्रांची सविस्तर चर्चा व्हावी  म्हणून  ….………  

शनिवार, २ मार्च, २०१३

काय लिहावे असे सतत  वाटल्या मुळे बरेच काही लिहिणे राहूण गेले. पण एक मात्र खरे कि माणूस हा सामाजिक प्राणी असल्या मुळे त्याला सतत कोणाशी तरी बोलावेशे  वाटते. माझ्या मते संवाद हा मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यावरचा अत्यंत महत्वा अविष्कार आहे . कदाचित रानाटी  अवस्थेत भिती किंवा गरजेतून संवादाला  सुरुवात झाली आसावी, पण हळूहळू संवाद वाढत  गेला अन ती भावणिक गरज  निर्माण झाल्या मुळे  कुटुंबव्यवस्था अस्तित्वात आली असावी . त्यातून पुढे टोळी किंवा समुदाय हा पुढला टप्पा विकसित होताना  भाषा आणि संवादाचे महत्व टिकून रहिले. नातेवाईक आप्त इष्ट कुटुंबातील इतर सदस्य यांच्यातील संवाद मानवी संबंधांचे जाले विणत गेला. मागील काळात घड्याळ नव्हते परंतू वेळ होता, आज घड्याळ आहे पण वेळ नाही. म्हणून बोलणे नाही संवाद नहि. त्यातच टिव्ही, इंटरनेट व  मोबाईल मुले घरात सुद्धा कोनी  एकमेकाशि बोलेनाशे झाले आहे.  कुटे तरी एकटेपणाकडे माणसाची वाटचाल होते आहे अशी भीती  वाटते    आहे. म्हणून हे  मुक्तांगण ---------- सर्वांना गप्पा मारण्या साठी निवांत व सतत उपलब्ध असणारा कट्टा ---------या आपण पुन्हा बोलत राहू सुख -दु:ख वाटून घेऊ----चला बोलते होऊ ………. ………………. राम चव्हाण