मंगळवार, २० जून, २०२३

 वर्तमानस्थितीत राजकीय पक्षांना  धोरण व निश्चीत्त तत्व नाही  आणि राजकारणातील नेते व कार्यकर्त्यांना विचारधारा नाही ही अत्यान दुर्दैवी गोष्ट आहे...

शनिवार, १७ जून, २०२३

मला भावलेले संत तुकाराम

 

अभंग तुकाचे मला भावले


''सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियले नाही बहूमता
तुका म्हणे होय मनाशी संवाद|आपुलाची वाद आपनाशी''.

    ---- संत तुकाराम 

मायबापे केवळ काशी |
तेणें न नदीने तीर्थासी || ||
पुंडलीकें काय केले ? |
परब्रह्म उभे ठेले || ||
तैसा होई सावधान |
ह्रदयी धरी नारायण || ||
तुका म्हणे मायबापे |
अवघी देवाची स्वरुपे || ||
                 (अभंग क्र. २९०६)

लेकराचे हित | वाहे माउलीचे चित्त ||||
ऐसी कळवळ्याची जाती | करी लाभेंविण प्रीती ||||
पोटीं भार वाहे | त्याचे सर्वस्व ही साहे ||||
तुका म्हणे माझे | तैसे तुम्हा संतां ओझे ||||

                     (अभंग क्र. १७४१)

 

 

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९

जुने जाऊ द्या मरणालागुनी…….
महाराष्ट्राला विचारांची थोर परंपरा आहे. अनेक वर्षे महाराष्ट्राने देशाचे वैचारिक नेतृत्व केले आहे. संत परंपरा, देशाच्या स्वतंत्र लढ्याचे नेतृत्व, पुरोगामी विचारांची चळवळ, समाजप्रबोधनाच्या चळवळी,  महापुरुषांनी दिलेले वैचारिक योगदान, स्वातंत्रोत्तर कालखंडातील सहकार चळवळ, देशाच्या पुरोगामी अन प्रतिगामी विचाराचे व चळवळीचे   नेतृत्व करणे, आत्यंतिक कडवे डावे व त्याचवेळी खुल्या अर्थवयवस्थेचे खणखर समर्थक अशे  अनेक विरोधाभास महाराष्ट्राने जोपासले  आहेत . या चांगल्या  परंपरा प्रमाणे  महाराष्ट्रातील समाजघटकांकडून खुपमोठ्या ऐतिहासिक चुकाही झाल्या आहेत. अन्याय, अत्त्याचार, अन शोषण इ. चा क्लेशदायक कालखंडही मराठी माणसाने अनुभवाला आहे , अशा क्रूर घटनांनी महाराष्ट्रातील समाजमन अनेकवेळा गलीतगात्र अन छिन्नविछिन्न झाले आहे.
परंतु हेही वास्तव आहे की  इतिहासातील जुन्या गोष्टीचा तोच तो पणा माणसाला प्रगती पथाकडे नेऊ  शकत नाही. नीटपणे समजून घेतले असता असे लक्षात येते की आज ही मराठी मन इतिहासातील खोटे दाखले, परंपरेने व जन्माने मिळालेले मोठेपण, चांगल्या वाईट परंपरा, गतजीवनात भोगलेले अन्याय-अत्याचार  व हाल-अपेष्टांच्या निबिड वैचारिक अरण्यात अडकल्याचे जाणवते. भूतकाळातील आभासी जगात रममान होणे, गतकाळातील वेदनांच्या आठवणीत  अडकणे यामुळे कोणत्याही समाजाचे भविष्य उज्वल होऊ शकत नाही. ऐतिहासिक वारसा, भूतकाळात केलेल्या चुका या पासून धडा घेऊन त्यात कठोर अशा सुधारनां करून समाज उन्नतीसाठी, पुढे जाण्यासाठी  उन्नत विचारांचा व समन्वयाचा मार्ग शोधणे अत्यंत्यिक आवश्यक असते. अशाच प्रकारे एक अत्यंत विषम सांस्कृतिक वारसा व संघर्षाचा इतिहास असणाऱ्या समाजाने एकात्म होऊन नवीन मानवी संस्कृतीचा पाय घालत अमेरिकन समाजाने सारखे एक बलाढ्य व समृद्ध राष्ट्र उभा केले आहे.
मानवी समूहांची शक्ती ही माणसाच्या एकूणच प्रगतीसाठी आवश्यक असते. मानव समूह नेहमीच गुणदोष युक्त राहिला आहे. दोष दूर करून नव्या काळाच्या मानवी गुणांसह मानव व निसर्गाच्या सहअस्तित्वसाठी सतत प्रयत्नरत राहिले पाहिजे. परंतु आज धर्यहीन, अनुत्साही, ढोंगी, स्वार्थी मंडळी आपल्या व्यक्तिगत आशाआकांक्षा साठी समाज विघातक, फुटीरतावादी व द्वेषमूलक असे नेतृत्व समाजाच्या सर्व आघाड्यावर प्रस्थापित होण्याचा धोका निर्माण झाला आहे आणि  त्यामुळे महाराष्ट्राच्या वैचारिक नेतृत्वाचा वारू आपल्याला भटकलेला दिसतो आहे. थोर साहित्यिक व विचारवंत रा. ग. जाधव यांनी एके ठिकाणी असं लिहिलं आहे की, "मानव्याचे अन संस्कृतीचे मूल्यभान बाळगणाऱ्या कुणाही व्यक्तीला वैफल्यग्रस्त करणारी ही परिस्थिती आहे. अशा वेळी  समजतील  सर्व सृजनशील, मानवतावादी व्यक्तींनी याचा गांभीर्याने विचार करून समाजमनाला  विविधतेसह सहअस्तित्वासाठी जाणीव पूर्वक तयार करण्यासाठी निरंतर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्राणी-वनस्पती समूह असो वा मानवी समूह, विविधता हा निसर्गाचा स्थायी भाव आहे. सहअस्तित्व हा निसर्गाचा महत्वाचा गुण  आहे.  एखादा विचार, संस्कृती किंवा राज्यकर्ता घटक जेव्हा व्यक्तीच्या मूलभूत स्वातंत्र्यावर निर्बंध आणतो त्या वेळी समाजाने विचारशील होऊन सक्रिय पने कार्य करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासाठी संत ज्ञानेश्वरांचे "पसायदान" एक लोकशिक्षणासाठी  सांस्कृतिक ठेव आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राने समाजाचे नेतृत्व करण्यासाठी जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या या कवितेत मार्ग शोधावा असे वाटते…
                                        नांगरू स्वप्ने उद्याची, येथली फुलतील शेते
                                        घाम गाळील ज्ञान येथे, येथुनी उठतील नेते...
                                        आता इथे ऊजाडे ज्ञानाची पहाट
                                          नव्या माणसांची इथून निघे पायवाट
                                                        ------- बाबा आमटे 

बुधवार, २९ मे, २०१९

चिंता.......

खरंच मला माणूस म्हणून घेण्याची लाज वाटते...... तुम्हाला पण वाटते का? 
माझ थोडस कन्फ्युजन आहे ....  समाजाचे सर्वच प्रश्न फक्त जातीनिहाय असतात का?.....
सरकारी योजनांशिवाय शहरातील (इंडिया ) संपत्ती चलन रूपाने कष्टाच्या माध्यमातून  ग्रामीण भागात (भारतात)   हस्तांतरित व्हावी या साठी काय करता येईल...... 

गुरुवार, २१ मार्च, २०१९

शेती आणि शेतकरी : एक चिंतन
भारतीय शेतीचे नियोजन चुकले आहे का ?
नियोजन करते , अर्थशास्त्रज्ञ, विचारवंत आणि समाज चुकीच्या पद्धतीने विचार करतात .
त्यामुळे आज भारत आर्थिक दिवाळ खोर बनला आहे .
संपतीचे केंद्रीकरण , बहुसंख्य समाजाची कृयक्षतीचा ऱ्हास इ .
वाढत सरकारी करण,

चितनांचे मुद्ये
 शासनाचे उत्पन्न पगारदारांचा आयकर असणे घातक
शेतीवर कर बसविणे आवश्यक
संपत्तीची निर्मिती
मुल्य वृध्दी
विनीमय मुल्य इ.

शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८

Dr. Mukund Sawant


मला भावलेले प्रा. मुकुंद सावंत
परिचय
प्रा. मुकुंद सावंत सर आणि मी धारूर महावीद्यालयात एकाच वर्षी रुजू झालोत ते वर्ष म्हणजे १९९२. माझी नेमणूक त्यावेळी अस्थायी स्वरुपाची होती तर सावंत सर गंगापूरच्या मुक्तानंद महाविद्यालयातून बदली होऊन इथे आले होते. प्रा. मुकुंद सावंत सर हे त्यावेळी धारूरचे  नगराध्यक्ष म्हणून नगर  पालिकेवर निवडून  आले होते. मी त्यावेळी अत्यंत नावाखा असल्यामुळे त्यांच्याशी तसा माझा जास्त परिचय नसला तरी त्यांनी त्यावेळी राजकारणात केलेला बंडखोरी आणि त्यांचे समाजातील स्थान यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे एक वेगळेच आकर्षण होते. त्याच दरम्यान त्यांच्याकडे झालेली चोरी, त्यांना आलेले हृदयविकाराचा आलेला झटका यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व आणखीच लक्षवेधी  झाले आणि त्यांचा परिचय व्हावा असे वाटू लागले.
हळू हळू मीही महाविद्यलयात रमू लागलो, दुपारनंतर आमची स्टाफरूम मध्ये भेट होऊन   चर्चा होऊ लागली. कधी मतभिन्नता तर कधी त्यांचे विचार मला पटू लागले. नंतर आमच्यात बर्यापैकी मैत्री झाली. महाविद्यालयाचे प्रश्न, विज्ञान शाखेचे अनुदान, मुंबईचे जीवन,  राजकीय चर्चा, सामाजिक प्रश्न, आहार  यावर तासंतास आम्ही चर्चा करत असू. सुरुवातीच्या काळात टे मांसाहारी आहारावर खूप तिखट शब्दात टीका करत नंतर टे आमच्यासोबत जावू लागले हा भाग वेगळा. दरम्यानच्या काळात आमचा स्नेह वादात गेला आणि आमची बऱ्यापैकी घनिष्ट मैत्री झाली.
विद्यार्थी प्रिय आणि व्यासंगी शिक्षक
दुपारच्या सत्रात आम्ही स्टाफ रूम मध्ये चर्चा करत बसत असू. शिक्षण क्षेत्रातील प्रश्ना संबंधी त्यांची मत अन तळमळ मलाच नाही आम्हा विज्ञान शाखेतील सर्वांना  प्रभावित करू लागली. त्यांच्यातल खरा शिक्षक आम्हाला लक्षात येऊ लागला. प्रा. मुकुंद सावंत सर नियमित तासिका घेत असत. नगराध्य पदावर काम करत असताना असो कि प्राचार्य पदावर कार्यरत असतानाही त्यांनी कधी तासिका न घेतल्याले आठवत नाही. चर्चे अंती ते विद्यार्थी प्रिय शिक्षक असल्याचे लक्षात आले. धारूर महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतचे सर्वच प्राध्यापक हे नियमित अन विद्यार्थी प्रिय असल्याचे निदर्शंस आले. त्यामुळे वाणिज्य शखेत नियमित येणाऱ्या मुलांचे संख्याही भरपूर असायची आणि निकालही उत्तम लागावयाच. सार्वजनिक  जीवनात सक्रीय असूनही सावंत सर त्याला अपवाद नव्हते. सावंत सरांच्या तासाला भरपूर मुल-मुली उपस्थित असायच्या आणि  सरही मुलांना आवडीने अन तन्मयतेने शिकवायचे. शिक्षणाती नवे प्रवाह, आधुनिक अध्यापण  पधत्ती यांचा ते वापर करून ते विद्यार्थ्यांना  मनापासू  शिकवत असत. सावंत सर आमच्यासाठी एक आदर्श शिक्षक म्हणून आम्हा नवीन लोकांना नेहमीच प्रेरणा देत राहिले.
कुशल प्रशासक
दरम्यानच्या काळात डॉ. बाबासाहेब कोकाटे यांनी प्राचार्य पद सोडल्या नंतर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांच्यावर धारूर महाविद्यालयाच्या प्रभारी पदाची जिम्मेदारी सोपवली . त्या संदर्भात संस्थे कडून विचारणा झाल्यानंतर त्यांनी ग्रंथपाल देशपांडे सर आणि ईतर काही वरिष्ठ सहकार्यासोबत चर्चा करून जिम्मेदारी घेण्याची तयारी दर्शवली.  अश्या प्रकारे प्राचार्य पदाच्या कार्यकाळात त्यांनी महाविद्यलयात एक चांगली टीम निर्माण केली आणि सर्वांना आपुलकीने कामाला लावले. अर्थात वेळप्रसंगी त्यांनी कठोर भूमिका घेऊनही आपली प्रशासकिय चुणूक द्खून दिली.  नक चे काम, हिंदीचे राष्ट्रीय चर्चा सत्र, विद्यापीठ अनुदान आयोगाचे वसतिगृहाचे बांधकाम, शेतकरी परिषद व इतर अनेक उपकराचे यशस्वी आयोजन त्यांच्या प्रशास्कीय कामाचे धोतक आहेत. किती जावाचा मित्र असेल तरीही तासिकांच्या बातीत त्यांनी कोणाचीही गय केलेई नाही. त्यांच्यात उत्तम नेतृत्व क्षमता आहे  आणि प्रशासनावर त्यांची मजबूत पकड असल्यामुळे त्यांच्याकडे निर्णय क्षमता असायची अन त्यामुळे प्रशासन गतिमान व्हायचे. संस्थाचालकांचा संपुर विस्वास, शिक्षक-शिक्षकेतर  कर्मचार्यांचे सहकार्यांची, विद्यार्थाय्न्विषयी तळमळ, पालकांशी असणर सुसंवाद यामुळे त्यांचा प्राचार्य पदाचा कार्यकाल स्मरणीय राहिला.
प्रेमळ, कुटुंब वत्सल आणि व्यवहार चतुर
सार्वजनिक जीवनात आणि महाविद्यालय वेगवेगल्या जिम्मेदारी आणि आपले सर्व कामकाज नियमित अंत काटेकोर पाने पारपडणारे प्रा. सावंत आपली व्यक्तिगत अनो कौटुंबिक जीवनातही अत्यंत यशवी राहिले आहेत. शेती असेल, छोटी-मोठी खरेदीअसेल, बाजारपेठेतील उठ-बस असेल त्यांच्यातील व्यवहारीकपणा आपल्याला ठळकपणे जाणवतो. ते जिवनात कोणत्याही व्यवहारात आपल्याला यशस्वी झालेले दिसतील. खरेतर तो व्यवसायिकपणा धारूरच्या मातीतच आहे  सावंत सरही त्याला अपवाद नाहीत त्यामुळे सावंत सरांनी कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत उत्तम ठेवली आहे. मुळात संवेदनशील असणारे सावंत सर अत्यंत कुटुंब वत्सल आहे. आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या  त्यांनी अत्यंत व्यवस्थित  पार पडल्या  आहेत. सावंत सर नेहमीच आपल्या मित्र परिवार आणि सहकार्याशी प्रेमाने वागताना आढळतात आणि वेळोवेळी गरजेप्रमाणे अनिकांना त्यांनी सहकार्य केलेले आहे.
मुंग्यांचे भारूड :-
मुंगी पृथ्वीतलवरील  एक छोटासा जीव. सगळ्यांच्या ओळखीचा आणि सर्वत्र आढळणारा एक  . अंटार्टिका वगळता सर्वत्र मुंग्यांचे वास्तव्य आढळते.संधिपाद प्राण्यांच्या समूहातील कीटक या वर्गातील हायमेनॉप्टेरा या  गटात   मधमाश्या, भुंगा, गांधीलमाशी व इतर  कीटकांसह मुंग्यांच्या फॉर्मिसिडी या कुटुंबाचा  समावेश होतो.    आजमितीला पृथ्वीवर मुंग्यांच्या चौदा हजारापेक्षा जास्त जाती  आहेत. भारतात मात्र  मुंग्यांच्या हजारापेक्षा कमी  जाती आढळतात.